नवसंस्कृती व नवा मानव
आपणास एक नवी संस्कृती निर्माण करावयाची आहे याची जाणीव आम्ही सतत ठेविली पाहिजे. तीनशे वर्षांपूर्वी युरोपखंड आधुनिक युगात आले, भौतिकविद्येत त्यांनी आघाडी मारली. भौतिक सत्याचे संशोधन करीत असताना आप्तवाक्य व शब्दप्रामाण्य यांच्यापुढे जाऊन बुद्धिवाद आणि आत्मप्रामाण्य यांचा आधार घेतला. बुद्धिवादातून बुद्धिस्वातंत्र्य जन्मास आले आणि या बुद्धिस्वातंत्र्यासाठीच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार प्रथम करण्यात आला. त्यांच्या संरक्षणासाठी राज्यक्रांत्या कराव्या …